दहा वर्षापूर्वी सुरु झालेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला लागणार्या सर्व परवानग्या अद्याप मिळाल्या नव्हत्या. यामध्ये वन विभागाचा देखील समावेश होता. ८० टक्के काम पूर्ण होत असताना काही जागांवर काम करण्यास वन विभागाची आडकाठी होती. अखेर वन विभागाने वन संवर्धन आणि वृक्ष लागवड कामासाठी मोबदला रक्कम भरून या परवानग्या दिल्या आहेत. यामुळे रखडलेला महामार्ग पूर्ण होण्याची शक्यता आहे.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला पनवेल ते इंदापूर सुरवात १० वर्षा पूर्वीच झाली होती. ८० टक्के काम पूर्ण झाले असले तरी नियोजनाच्या अभावामुळे हे काम आजही अर्धवटच आहे. दुसर्या टप्प्याच्या कामाला इंदापूर ते कोकणच्या तळा पर्यंत च्या कामाला सुरवात झाली आहे. दुसर्या टप्प्याचा चौपदरीकरणचे काम जवळपास ७० टक्के काम पूर्ण झाले आहे मात्र काही भागात वन विभागाची परवानगी नसल्यामुळे काम थांबलेले होते. महाड, माणगाव आणि पोलादपूर तालुक्यात हीच परस्थिती निर्माण झाली होती ६५ किलोमीटरच्या अंतरामध्ये ६ किलोमीटरमध्ये वनखात्याच्या जमिनी असल्यामुळे या विभागाकडून अद्याप परवानगी मिळाली नव्हती त्यामुळे या अंतराचे काम आज ही थांबलेले आहे. दुसर्या टप्प्याच्या कामामध्ये इंदापूर ते पोलादपूर या ६५ किलोमीटरच्या अंतरामध्ये माणगाव तालुक्यात ३.१५ आणि महाड तालुक्यात २.९५ किलोमीटर अंतरामध्ये १८.४४ हेक्टर ही वनखात्याची जमीन आहे. या जमिनी मध्ये अध्याप वनखात्या कडून राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला परवानगी मिळाली न्हवती या परवानगी साठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून २०१८ साली वन खात्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आले होते. अनेक वेळा वन विभागाकडून त्रुटी काढून हा प्रस्ताव लाल फितीती अडकून राहत होता. अखेर एप्रिल २०२१ मध्ये पहिल्या टप्प्यात परवानगी मिळाली त्या नंतर काही अटी शर्तीवर १५.९१ कोटी रुपये भरून या ठिकाणच्या कामाला परवानगी देण्याचे निश्चय झाले. त्या प्रमाणे राष्ट्रीय महामार्ग विभागाने प्रस्ताव तयार करून वनखात्याकडे पाठवण्यात आला मंजुरी मिळताच २ ऑक्टोबर २०२२ मध्ये महामार्ग विभागा कडून १५.९१ कोटी ही रक्कम वनखात्याकडे वर्ग करण्यात. ज्या ठिकाणी ६५ की मी अंतरा मध्ये वन खात्याच्या जमिनी आहेत त्या ठिकाणी महामार्ग विभागाला नोव्हेंबर २०२२ मध्ये अखेर कामाची परवानगी मिळाली. महामार्ग विभागाने वृक्ष लागवड करणे आणि वन संवर्धन याकरिता हि रक्कम भरून घेतली आहे.
⭕मार्गांची कामे शिल्लक
राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून मिळालेल्या माहिती नुसार इंदापूर ते पोलादपूर भोगाव यामध्ये माणगाव तालुक्यातील कशेणे, साळे, कलमजे, खर्डी बुद्रुक, उतेखोल, भादाव, ढाळघर, जावळी, गारळ, मुंगवली, लोणेरे आणि वडपाले या गाव ठिकाणी ३.१५ किलोमीटर एवढे काम शिल्लक आहे. तर महाड तालुक्यातील वीर ते दासगाव या २.९५ कि मी अंतराचे चौपदरीकरण काम शिल्लक आहे. एकूण १८.४४ हेक्टर जमिनी मध्ये ६ कि मी एवढ्या अंतराचे काम आहे. माणगाव तालुक्यात चेतक ठेकेदार कंपनीकडून काम सुरू असून महाड तालुक्यात एल अँड टी कंपनीकडून काम सुरू आहे. वीर ते दासगाव या टप्प्यामध्ये सर्व्हे सुरू असून लवकरच कामाला सुरवात केली जाणार असून ३१ मार्च २०२३ पर्यंत काम पूर्ण करण्यात येणार आहे तर माणगाव तालुक्यातील काम देखील लवकर सुरू केले जाणार असून डिसेंबर २०२३ अखेर हे देखील काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वासन महामार्ग विभागाकडून दिले जात आहे.
⭕ उच्च दाबाची वीज वाहिनीमुळे काम थांबलेलेच
वन विभागाचा अडसर दूर झाला असला तरी राजेवाडी गावाजवळ महामार्गावरून कोयना वीज प्रकल्पाची विद्युत वाहिनी गेली आहे. जुन्या महामार्गाला भराव करून याठिकाणी उंची वाढवण्यात आली आहे. यामुळे विद्युत वाहिनी आणि रस्त्यातील अंतर कमी झाले आहे. यामुळे याठिकाणी ही विद्युतवाहिनी बाजूला करणे गरजेचे आहे. कोयना प्रकल्पाची ही विद्युतवाहिनी दूर करणे सहज शक्य नाही. यामुळे याठिकाणी हे काम थांबले आहे. दोन्ही बाजूने काम पूर्ण झाले असले तरी विद्युतवाहिनीच्या खालील भाग रखडला आहे. महामार्गाच्या कामापूर्वी चुकीचा सर्व्हे झाल्यामुळे अनेक भागात अशा प्रकारे काम रखडल्याचे समोर येत आहे.
∆ वन विभागाची परवानगी मिळाली असल्याने वीर ते दासगाव भागात सर्व्हे सुरू आहे. काही दिवसातच माणगाव भागातील सर्व्हे करण्यात येणार आहे. लवकरच या चौपदरी च्या अडकलेल्या कामांना सुरवात होणार आहे.
– ए. एन. मेश्राम,सहाय्यक कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग.