बीड प्रतिनिधी :-आदर्श शिक्षण संस्थेचे सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयात विश्व रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे सल्लागार डॉ.अरुण भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य डॉ.महेंद्र गौशाल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.गौशाल यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्र विषयी सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी तथा उपप्राचार्य गणेश पांगारकर डॉ.विवेक दुसाने,डॉ.रावसाहेब हंगे,डॉ. अंजली पवार,डॉ.वैभव शहापुरे,राष्ट्रीय सेवा योजना सचिव रोशन राठोड यांचे सह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.