शिरुर: नामावंत तमाशा फडमालक, ढोलकीचा बादशाहा व शासनाचा जीवनगौरव पुरस्कार पटकावलेले गंगाराम बुवा रेणके (कवठेकर) यांचे आज (गुरुवार) पहाटे निधन झाले आहे.
कवठे येमाई येथील गंगाराम बुवा कवठेकर यांनी एकेकाळी राज्यात तमाशा क्षेत्रात नामवंत फडमालक, ज्येष्ठ ढोलकी पटू, लोकगीतकार, लेखक व कवी म्हणून नावारुपाला येवून महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांवर अनेक वर्ष राज्य केले होते. ढोलकीचा बादशहा गंगाराम बुवा कवठेकर-रेणके यांचे यांचे आज (गुरुवार) पहाटे निधन झाले. मृत्यूसमयी ते ९६ वर्षांचे होते. महाराष्ट्र शासनाच्या सर्वोच्च अशा जीवनगौरव पुरस्काराने गंगारामबुवांना सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने समस्त रेणके परिवारासह कवठे येमाई गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्राथमिक शिक्षक राजेंद्र रेणके यांचे ते वडील होत. युवा सामाजिक कार्यकर्ते विशाल (सनी) रेणके, अनिकेत रेणके यांचे ते आजोबा होत.
त्यांच्या निधनाबद्दल माजी गृहमंत्री ना. दिलीपराव वळसे पाटील, शिरुरचे माजी आमदार पोपटराव गावडे, दामुशेठ घोडे, भीमाशंकर साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रदीपदादा वळसे पाटील, शिरुर पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे, बेल्हा लोकनाट्य राज्यस्तरीय तमाशा महोत्सवाचे अध्यक्ष वसंतराव जगताप, आझाद बोरगावकर, सरपंच सुनीता पोकळे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीणकुमार बाफणा, वैशाली रत्नपारखी,मधुकर रोकडे, वसंत पडवळ, अभिजित लंघे व अनेक ग्रामस्थांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
शिरुर तालुक्यातील कवठे येमाई गावचे नाव कलेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवण्याचे काम या कलावंताने केले आहे. अशा या कलावतांला भावपुर्ण श्रद्धांजली.
दिपक रत्नपारखी (मा. सरपंच कवठे येमाई)