कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील हिंमतराव देशमुख यांनी आपल्या 2 ऐकर शेतात कपाशी पिकाची लागवड यावर्षी केली आहे त्या कपाशी पिकावर लाल्या या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्याच्या उत्पादन घटणार असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला असून हवालदिल झाला आहे. असे असताना जिल्ह्यातील विमा कंपनीच्या ढिसाळलेल्या कारभारामुळे अजून पर्यंत शेतकऱ्याला कोणते प्रकारचे आर्थिक मदत झाली नसल्याने विमा कंपनीच्या धोरणावर शेतकरी संतप्त झाले.एकीकडे यावर्षी पडलेल्या मुसळधार पावसामुळे आधीच कपाशी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे असे असताना वारणवार मुख्यमंत्री साहेबांकडून घोषणा करतात की मी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही पण अजून पर्यंत ही सरकारचे अनुदानित मदत मिळाली नसल्याने शिंदे सरकारच्या कारभारावर शेतकरी खुश नसल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक मदत तात्काळ कशी करता येईल याबाबतचे धोरण राबवण्याची गरज असल्याची भावना शेतकऱ्याकडून व्यक्ती केली जात आहे.