त्या अपहरणकर्त्याना एक दिवसाची पोलीस कोठडी....
पैठण पोलिसांचा न्यायालयासमोर जोरदार युक्तिवाद...
पैठण-बिडकीन व परिसरातील गाजलेल्या 30-30 नावाच्या आर्थिक घोटाळ्यातील गुंतवणूक रकमेच्या वसुली साठी एजंटाचे पैठण शहरातुन अपहरण करण्यात आले होते मात्र पोलिसांनी अपहरण कर्त्याना सहा तासाच्या आत अपहरण झालेंल्या पीडित व्यक्ती सह शिताफीने पुण्यातून तीन जणांना अटक केली होती आज त्यांना पैठण येथील कोर्टात हाजर केले असता पोलिस व सरकारी वकीलाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला यामुळे अटकेत असलेल्या तिन्ही अपहरणकर्त्याना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे...विशेष म्हणजे यावेळी पीडितेने न्यायालयात आपला जबाब उलटविला आहे...मात्र पो.नि. किशोर पवार व पैठण पोलिसांच्या वतीने सावध भूमिका घेत न्यायालयात अत्यंत सचोटीने बाजू मांडल्याने त्या तिघांना एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली*