फुलंब्री शहरात पोळ्यानिमित्त आयोजित कुस्त्यांच्या आखाड्यात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी सुरू झाली. ती सोडवताना पोलीस निरीक्षकासह दोन पोलीस कॉन्स्टेबलही जखमी झाले. ही घटना शनिवार (दि. २७) रोजी 4:30 वाजेच्या दरम्यान फुलंब्री येथील बाजारपट्टी परिसरात घडली.
फुलंब्री येथे पोळ्यानिमित्त शनिवारी कुस्त्याची दंगल सुरू असताना दोन गटांमध्ये सुरुवातीला किरकोळ बाचाबाची झाली. गावातील प्रतिष्ठित मंडळींनी दोन्ही गटांची समजूत काढून वाद मिटविला. परंतु काही वेळानंतर फुलंब्री येथील घटना; मध्यस्थी करताना पोलीस निरीक्षकांसह तीन कर्मचारी जखमी झाले यानंतर एका गटाने मोठा जमाव एकत्र करून किरकोळ भांडणाचे रूपांतर हाणामारीत केले. त्यानंतर या ठिकाणी तैनात असलेले पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे. पोलीस कॉन्स्टेबल संजय चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल अनिल शिंदे आणि प्रतिष्ठित ग्रामस्थांनी मध्यस्थी करून भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु दोन्ही गट ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. या हाणामारीत पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे,गोपनीय शाखेचे अनिल शिंदे,पोलीस कॉन्स्टेबल संजय चव्हाण हे किरकोळ जखमी झाले होते. तर दोन गटांतील गणेश गंगाधर रघू, सईद महमूद पटेल,कृष्णा रत्नाकर पाथरे, बाबर इलियास पटेल, सोफियान निसार पटेल, शाकेर इलियास पटेल,हे गंभीर जखमी झाले होते हे सर्व फुलंब्री येथे राहणार असून यांना प्राथमिक उपचारांसाठी फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.
यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, यानंतर फुलंब्री शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते,यावर पोलिसांनी दंगा काबू पथकाला पाचारण केले होते यानंतर पोलिसांनी परिस्तितीथीला नियंत्रणात आणले,यानंतर फुलंब्री पोलीस स्टेशन येथे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया,अप्पर पोलीस अधीक्षक पवन बनसोड,उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर,यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता बेठक घेण्यात आली यावेळी फुलंब्री शहरातील सर्व राजकीय पक्षाचे प्रमुखाची उपस्थिती होती.यावेळी पोलीस अधिक्षक मनीष कलवानिया यांनी शहरात शांतता कायम ठेवण्याचे आव्हाहन केले त्याच प्रमाणे शोषल मीडियावर या घटनेची चुकीचे मेसेज,अथवा अफवा पसरू नये,नसता कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.सदरील घटनेत पोलीस अंमलदार अनिल शिंदे सवतः फिर्यादी होऊन तक्रार दिली असून यामध्ये 18 लोकांनवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून इतर दहा लोकांचा ही समावेश असून एकूण 28 लोकांवर गुन्हे दाखल करण्यातआले आहे. यामध्ये ,353,308,143,144,145,147,149 याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे