यवतमाळ : वणी तालुक्यातील शिंदोला परिसरातील शेकडो विद्यार्थी- विद्यार्थिनीना बसफेरी अभावी शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. शालेय वेळेत बससेवा उपलब्ध नसल्याने वणी ला ये- जा कशी करावी असा यक्षप्रश्न विद्यार्थ्यापुढे उभा ठाकल्याने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी आक्रमक भूमिका घेत उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांना निवेदन देत तीन दिवसांत बसफेऱ्या सुरु कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन उभारावे लागेल असा इशारा दिला आहे.शिंदोला परिसरातील अनेक गावातील विद्यार्थ्यांना वणी येथे    ये- जा करण्यासाठी बसची सुविधा उपलब्ध नाही.शिंदोला ते वणी बससेवा शालेय वेळेत सुरु करणे गरजेचे आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.