शिरुर दिनांक ( वार्ताहर ) थापेमळा, तर्डोबाचीवाडी, शिरूर येथील प्रा .  प्रसाद श्रीराम कर्डिले यांची क्रीडा व युवक संचालनालाय, महाराष्ट्र राज्य सरळ सेवा परीक्षेतून जिल्हा क्रीडा अधिकारी पदी निवड झाली आहे .                सन 2023 साली झालेल्या क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य सरळसेवा क्रीडा अधिकारी परीक्षेतून प्रा. श्रीराम कर्डिले यांची जिल्हा क्रीडा अधिकारी या पदावर निवड झाली. नुकतीच त्यांना उप संचालक कार्यालय, मुंबई येथे नियुक्ती मिळाली आहे. कर्डिले यांचे वडील  श्रीराम कर्डिले हे पुणे पोलीस मध्ये 37 वर्षे सर्व्हिस करून पोलीस उप निरीक्षक म्हणून निवृत्त झाले. तसेच याच्या आई  उमा कर्डिले या गृहिणी आहेत व पत्नी सौं. प्रियांका प्रसाद कर्डिले या मुंबई पोलीस खात्यात पोलीस उप निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.  प्रसाद कर्डिले यांचे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षण पुणे येथे झाले असून त्यापुढील बी. पी. एड., एम. पी. एड. हे शिक्षण हे औरंगाबाद येथे झाले. तसेच त्यांनी राज्यस्तरीय सेट परीक्षा उत्तीर्ण केली असून शारीरिक शिक्षण संचालक पदावर गेली 10 वर्षे रयत शिक्षण संस्था तसेच पुणे येथील डी. सी. एम. संस्थे मध्ये नियुक्त होते. प्रा. प्रसाद कर्डिले हे स्वतः कुस्ती, कबड्डी आणि तायक्वान्डो खेळाचे खेळाडू, प्रशिक्षक आणि पंच असून गेली 15 वर्षे विविध राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर सतत कार्यरत आहेत. गेली अनेक वर्षे त्यांनी शासकीय स्तरावर अनेक परीक्षा दिल्या तसेच अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षे साठी मार्गदर्शन केले. त्यांचे अनेक विद्यार्थी महाराष्ट्रात विविध पदांवर शासकीय सेवेत रुजू झालेले आहेत . अनेकदा आलेले अपयश बाजूला ठेऊन अभ्यासातील सातत्य, नियमितता आणि स्वतःच्या मूळ कार्यक्षेत्रामध्ये सतत कार्यरत राहणे हेच त्यांच्या  यशाचे सूत्र आहे असे ते आवर्जून सांगतात.कर्डिले यांच्या निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .