शिरुर दिनांक ( वार्ताहर ) येथील जुन्या पिढीतील लक्ष्मीबाई नारायण गायकवाड ,वय ८९ यांच्यावर शेकडोच्या उपस्थितीत शोकाकूल वातावरणात शिरुरच्या अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले . राज्याचे सेवानिवृत्त साखर आयुक्त शेखर गायकवाड , महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरीतील प्राध्यापक व कृषि अर्थतज्ञ डॉ. दीपक गायकवाड , पाटबंधारे खात्यातील सेवानिवृत्त आधिकारी दिलीप गायकवाड ,व जयश्री बोरुडे यांच्या त्या मातोश्री होत्या .अमरधाम स्माशानभूमीत अंत्यसंस्काराच्या वेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर , सनदी आधिकारी कांतीलाल उमाप , माजी आयुक्त प्रभाकर गावडे , सेवानिवृत्त आधिकारी चिंतामणी जोशी ,लोकजागृती संघटनेचे अध्यक्ष रवींद्र धनक , तहसिलदार डॉ. सुनील शेळके आदी  उपस्थित होते . आमदार ॲड .अशोक पवार , माजी आमदार काकासाहेब पलांडे , पोपटराव गावडे ,शासकिय आधिकारी बाबासाहेब नाईकवडी , अशोक लोणकर , जिल्हा बॅकेचे संचालक बाळासाहेब नर्के आदीनी यावेळी श्रध्दांजली वाहिली .