शिरुर - येथील बालाजी विश्व विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला . 

    दि.15 डिसेंबर व 18 डिसेंबर दरम्यान  विद्यालयामध्ये  एकलव्य' वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते . दि.15 डिसेंबर रोजी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले .याप्रसंगी बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदाशिव पवार , बालाजी विश्व विद्यालयाचे मुख्याध्यापक  .विनायक म्हसवडे, हिंद केसरी कुस्ती सहभागपटू पै.किरण अशोक पवार, पै.अशोक पवार शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष रामचंद्र व्यवहारे सदस्या गायत्री देव्हाडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन सरस्वती पूजन आणि मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले...कबड्डी ,खो-खो , लिंबू चमचा, रनिंग ,लांब उडी ,गोळा फेक, दोर उड्या ,तीन पायांची रनिंग आदी खेळाच्या स्पर्धा झाल्या 

प्रमुख  पाहुणे करण  पवार यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व पटवून देऊन एका तरी खेळात सहभागी व्हा,असे सांगितले. क्रीडा महोत्सवामध्ये रेड हाऊस या संघाने मानाची ट्रॉफी मिळवली सर्वात जास्त वैयक्तिक बक्षिसे आणि सांघिक बक्षिसे रेड हाऊस ने मिळवली . रेड हाऊस चे कॅप्टन सागर चिकणे व त्यांच्या संघातील शिक्षकांनी उत्कृष्ट पणे विद्यार्थ्यांना खेळाचे मार्गदर्शन केले. दि.18 डिसेंबर रोजी विजयी खेळाडूंना बक्षिस वितरण करण्यात आले.  बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे मंडळाचे अध्यक्ष सदाशिव पवार, रणजीत नलावडे, ब्रांझ मेडल्स चॅम्पियनशिप सिद्धी होळकर ,ऑल इंडिया गोल्ड मेडल कुस्ती खेलो इंडिया गोल्ड मेडल्स प्राप्त पार्थ कंधारे ,नॅशनल चॅम्पियनशिप बेस्ट प्लेअर अवॉर्ड विजेते साई चौगुले, कुस्ती प्रशिक्षक जयसिंग बनगर, झेड एस पवार,पै.करण पवार प्राचार्य विनायक म्हसवडे , गणेश मित्पल्लीवार, रामचंद्र व्यवहारे,  कापरे आदी यावेळी उपस्थित होत्व .विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते मेडल्स आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विद्यालयाच्या उपप्राचार्य स्वाती चत्तर, समन्वयक  शैला चौरे,.रेश्मा घार्गे, संदीप जामदार,क्रीडा शिक्षक दिपक कोठावळे, आदीनी प्रयत्न केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  वर्षा बांदल आणि ललिता पोंदे यांनी केले  आभार शैला चौरे यांनी मानले.