देशिकेंद्र विद्यालयाच्या स्वरुप नागापुरेच्या प्रयोगाची राज्यस्तरासाठी निवड
औसा प्रतिनिधी -राज्य विज्ञान संस्था रविनगर, नागपुर व शिक्षण विभाग (माध्यमिक)जिल्हा परिषद लातूर यांच्या वतीने श्री श्री रविशंकर विद्यामंदिर, लातूर येथे दिनांक 8व 9फेब्रुवारी 2023रोजी आयोजित 50व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2023मध्ये श्री देशिकेंद्र विद्यालय, लातूर येथील इयत्ता 6वीत शिकणाऱ्या स्वरुप शिवलिंग नागापुरे या विद्यार्थ्यानी तयार केलेल्या इनोव्हेटिव्ह मल्टिपर्पज किचन टूल ह्या प्रयोगास द्वितीय क्रमांक प्राप्त झाला असुन त्याची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल स्वरुप व त्याचे मार्गदर्शक शिक्षक एस.एल. चव्हाण यांचे जगप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ.विठ्ठल लहाने, लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ.गणपत मोरे साहेब,शिक्षणाधिकारी नागेश मापारी ,उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे मॅडम, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या जेष्ठ अधिव्याख्याता डॉ.भागीरथी गिरी मॅडम ,मुख्याध्यापक संघाचे राज्य उपाध्यक्ष श्री प्रकाश देशमुख आणि इतर मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, मेडल, सन्मानचिन्ह, आणि सायन्स किट देवून सन्मानित करण्यात आले.स्वरुपने तयार केलेल्या साहित्याद्वारे एकाच वेळी चपाती पोळी तयार करणे, भाजी कट करणे, मसाला वाटप करणे अशा विविध क्रिया करता एकाच वेळी करता येवू शकतात. वेळेची, श्रमाची, पैशाची बचत करणारे हे बहुउपयोगी मशिन आहे. स्वरुपच्या या यशाबद्दल देशिकेंद्र विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. टी. सगर, पर्यवेक्षक, विज्ञान विभाग प्रमुख, सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.