शेलुबाजार येथुन जवळच असलेले गोगरी गाव येथील युवा लेखक तथा सामाजिक कार्यकर्ते व छत्रपती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष गणेश नारायणराव बोथे, यांना महाराष्ट्र राज्याच्या नावलौकिक विकास कार्यासाठी लोक हितासाठी त्यांची तळमळ बघून त्यांचे साहित्य व सामाजिक क्षेत्रातील ऊलेखनिय कार्य केल्या बद्दल कला फाउंडेशन अमरावती द्वारा राज्यस्तरीय, राजे छत्रपति शिवाजी महाराज, पुरस्कार जाहीर झाला आहे या पुरस्काराचे लवकरच वितरण करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे पुरस्कार वितरण जानेवारी महिन्यात २०२३ मध्ये करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले आहे या पुरस्कारामुळे गणेश बोथे पाटील, यांच्या आतापर्यंतच्या यशस्वीतेत आणखी भर पडणार आहे त्यांना आता प्ररेत्य काव्य रत्न, युवा भुषण, समाज सेवा, साहित्य गौरव, समाज रत्न, इत्यादी अनेक पुरस्कार मिळाले असून आणखी एक पुरस्कार जाहीर झाल्यामुळे साहित्यिक पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रातून गणेश पाटील बोथे यांचे कौतुक केले जात आहे.
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं