एटीएम फोडणारी आंतरराष्ट्रीय टोळी जेरबंद 

गॅस कटरच्या सहाय्याने फोडले होते एटीएम 

 ५७ लाख रूपयांची रोकड केली होती लंपास 

 स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई 

पेण शहरात असणारे एसबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने फोडून त्यातून सुमारे सडे छपन्न लाख रुपयांची रोकड लांबविणाऱ्या चार जणांच्या आंतरराष्ट्रीय टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगडच्या पथकाने जेरबंद केले आहे. या चोरांकडून पोलिसांनी साडेआठ लाख रुपयांची मालमत्ता हस्तगत केली आहे.

पेण शहरात अज्ञातांनी एस. बी. आय. एटीएम सेंटर मधील एटीएम मशीन गॅस कटरचे सहाय्याने फोडून त्यातील ५६,३४,८०० रूपये रोख रक्कम चोरली होती.तत्कालीन पोलीस अधीक्षक अशोक दुधे , अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडेपोलीस निरीक्षक दयानंद गावडे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच पेण पोलीस ठाणे कडील पथक तयार करण्यात आले होती. तपसाचे दरम्यान गुन्हयाचे घटनास्थळी प्राप्त सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या आधारे एटीएम फोडणारी टोळी हरियाणा राज्यातील येथील असल्याची खात्री झाली होती. या दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी अनेकदा प्रयत्न केले होते. ,मात्र हाती यश आले नव्हते. 

दरम्यान रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक पदी सोमनाथ घार्गे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी जिल्हयातील दाखल गुन्हयांचा आढावा घेतला असता पेण पोलीस ठाण्याकडे दाखल एटीएम कटींगचा गुन्हा अद्याप उघडकीस न असल्याने सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याकरीता पोलीस निरीक्षक, स्था. गु.अ.शा. रायगड अलिबाग दयानंद गावडे यांना आदेशीत केले. सदर गुन्हयाचे अनुषंगाने माहिती घेणे सुरू होते. तपासादरम्यान तावडू पोलीस ठाणे, जि. नुह, राज्य हरियाणा येथील एका गुन्हयामध्ये वसीम अकरम अखतर हुसैन, वय ३०, रा. टुनडलाका, ता. पुन्हाना, जि. नुह, माजीद जुम्मा खान, वय.२५, रा.पिंपरोली, ता. पुन्हाना, जि. नुह, राज्य. हरियाणा यांना अटक केल्याची माहिती प्राप्त झाली . या अटक केलेल्या चोरांनी पेण पोलीस ठाणे येथील एटीएम कटींगचा गुन्हा केला असल्याची शक्यता असल्याने तात्काळ स्था.गु.अ.शा. रायगड अलिबाग कडील तपास पथक त्यांची चौकशी करण्याकरिता रवाना करण्यात आले होते. तपास पथकाने त्या दोघांकडे सखोल विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यामुळे सदर दोन्ही आरोपीत यांना पेण पोलीस ठाणे येथील गुन्हयामध्ये वर्ग करून घेण्यात आले. पोलीस तपासामध्ये त्यांनी पेण येथील एटीएम फोडण्याचा गुन्हा त्यांचे साथीदार हसन खान व साकीर अब्दुल रहीम खान यांचे मदतीने केला असल्याचे त्यांनी कबुल केले. त्या दोघांनाही पोलिसांनी अटक करण्यात केली. त्यांच्याकडून सुमारे ८,५०,०००/- रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स

या गुन्ह्यात अटक असलेला हसन सिराज खान, वय.३६, रा. बिचोर, ता. पुन्हाना, जि. नुह, राज्य हरियाना हा मागील दोन वर्षापासून पेण परिसरात जे.सी.बी. ऑपरेटर म्हणून काम करीत होता. त्यामुळे त्याला पेण, वडखळ परिसराची चांगल्या प्रकारे माहिती होती. त्याने त्या परिसरातील आठ ते दहा एटीएम सेंटरची पाहणी करून त्यातील कोणत्या एटीएम सेंटरमध्ये सीसीटीव्ही नाहीत किंवा कोणते एटीएम सेंटर चोरी करण्याकरीता सोपे आहे याची खात्री करून पेण एस.बी.आय. बॅकेचे एटीएम सेंटर निवडले होते. तसेच त्याला वडखळ परिसरात गॅस सिलेंडर कोणत्या ठिकाणी मिळतात याचीही माहिती होती. त्याप्रमाणे त्याने वडखळ मधून ऑक्सिजन गॅस सिलेंडर चोरून घेवून जावून त्याचे इतर साथीदार यांच्यासह मिळून सदरचा गुन्हा केला आहे.

स्थानिक गुहे अन्वेषण शाखेने अटक केलेल्या चार आंतरराष्ट्रीय दरोडेखोरांकडून ८,५०,००० रूपये किंमतीची मालमत्ता त्यामध्ये ५,००,००० रूपये रोख रक्कम व ३,५०,००० रूपये किंमतीची गुन्हा करण्याकरीता वापरलेले सफेद रंगाचे मारूती सुझुकी कंपनीची ईको कार हस्तगत करण्यात आली आहे. सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक, महेश कदम, धनाजी साठे, पोहवा प्रतिक सावंत, सुधीर मोरे, जितेंद्र चव्हाण, विकास खैरनार, राकेश म्हात्रे, अमोल हंबीर, अक्षय सावंत, सायबर सेल कडील पोना / तुषार घरत व अक्षय पाटील यांनी केली आहे.