संगमेश्वर : राष्ट्रीय महामार्ग 66 च्या सुरू अंधाधुंदी असलेल्या कामा विरोधात जन आक्रोश समिती बेमुदत उपोषणास संगमेश्वर येथे सुरवात झाली आहे.
राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता यांना दि.15 नोव्हेंबर ला महामार्गांवर सूरू आलेल्या चुकीच्या कामा संदर्भात पत्र व्यवहार करण्यात आला होता. त्यामध्ये असणाऱ्या मागण्या मान्यकेल्या नाहीत म्हणून उपोषणास सुरवात झाल्याचे रमजान गोलंदाज आणि परशुराम पवार यांनी सांगितले.
राष्ट्रीय महार्गावरील खड्डे,धूळ,कामाचे नकाशे ग्रामपंचायतला देणे,संगमेश्वर रिक्षा स्टॅन्ड,खोके वाल्यांचा प्रश्न,अनधिकृत बांधकाम तसेच अनधिकृत क्रेशर,निकृष्ट दर्जाचे बांधकाम अश्या विविध कामा संदर्भात निवेदन देण्यात आले होते.त्या पैकी काही मागण्या मंजूर करण्यात आल्या मात्र महत्वाचे विषया कडे लक्ष देण्यात आले नाही.त्यामुळे सगळ्यां संघटना एकवटल्या होत्या या उपोषणास सुमारे ४५ संघटनांनी पाठिंबा दिला असून मागण्या मंजूर झाल्या नाही तर हें आंदोलन तीव्र होईल.लोकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे आशेचे किरण असून ते न्याय देतील अशी अपेक्षा आहे व्यक्त केली आहे.
प्रशासनाला आम्हाला त्रासच द्यायचा आहे यामुळे आता आम्ही कंटाळून गेलो असून आम्हाला आता आमचे प्रश्न सोडवून हवेत.त्यासाठी वाट्टेल ते करायला आमची तयारी आहे.आमची तयारी आहें. कायदा आणि सुव्यवस्थेचा रक्षण व्हावं यासाठी सणदशीर मार्गाने जन आक्रोश समितीने उपोषण सूरू झाल्याचे सांगण्यात आले.
या उपोषणात शिवसेनेचे राजेंद्र महाडिक, राष्ट्रवादीचे विवेक शेरे, बाळा शेटे, युयुस्तु आर्ते, वहाब दळवी, परशुराम पवार रमजान गोलंदाज धनाजी भांगे, मैरुंनीसा साखरकर, रफिक साखरकर, दानिश बोट, राम शिंदे, मनोहर गुरव, रिंकू कोळवणकर, विशाल रापटे,जमूरत अलजी,तैमूर अलजी,राजेंद्र पोमेंडकर,गाव विकास समितीचे सुहास खंडागळे,अकबर दसूरकर,गणेश पवार,सुशांत जाधव निसार केळकर,राजेश आंबेकर,अतिश पाटणे,संगमेश्वर संघटनेचे पदाधिकारी,युवा संघटनेचे पदाधिकारी, नवनिर्मिती फाउंडेशनचे पदाधिकारी, खोके संघटनेचे अध्यक्ष आणि पदाधिकारी,उपस्थित होते