शैलेंद्र खैरमोडे :-

गंगापूर वैजापूर रस्त्यावर मांजरी फाटा येथे स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान व शेतकरी यांच्या वतीने वाल्मीक सिरसाठ यांचे नेतृत्वखाली महाराष्ट्र मध्ये नवीन सरकारचा राज्य शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी मांजरी महसूल मंडळातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांना सरसकट पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात यावे. या व इतर मागण्यांच्या संदर्भात गंगापुर ते वैजापुर रोडवर मांजरी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यां आंदोलनामुळे गंगापूर - वैजापूर महामार्गावर अर्धा तास वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

एनडीआरएफ च्या निकषानुसार जाहीर झालेली मदत फसवी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे गंगापूरहुन वैजापूर कडे जात असताना मांजरी फाटा येथे सुरू असलेल्या शेतकरांच्या आंदोलनाला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट दिली. याप्रसंगी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की एन डी आर एफ च्या निकषनुसार जाहीर झालेली मदत ही फसवी आहे. शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम हे सरकार करत आहेत. गंगापूर तालुक्यातील काही भागात प्रचंड पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. तर काही भागात कमी पाऊस आहे, पर्जन्यमापक यंत्रणा नसल्याने पावसाची नोंद होऊ शकली नाही. याला सर्व जबाबदारी शासनाची धोरणे आहे. सध्या विधिमंडळात शेतकऱ्यांचा समस्या घेऊन सरकारला जाब विचारनार असल्याचे माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले. यावेळी शिवसेनाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, लक्ष्मण सांगळे, कृष्णा पाटील डोणगावकर, माजी आमदार अण्णासाहेब माने यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.