बीड (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील प्रत्येक शासकिय कार्यालयात माहीती अधिकार दिन साजरा करा असे आदेश जिल्हा परिषद बीड आणि जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांनी शासकिय कार्यालयांना दिले आहेत. परंतू माहीती अधिकार दिन साजरा कसा करायचा याबाबत अधिकारी वर्ग संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. याबाबत अधिक माहीती अशी कि,बीड जिल्ह्यात माहीती अधिकार दिन साजरा करावा अशी मागणी माहीती अधिकार कार्यकर्त्यानी प्रशासनाकडे केली होती. प्रशासनाने सदर मागणीची दखल घेत बीड जिल्ह्यातील सर्व शासकिय कार्यालयात माहीती अधिकार दिन साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. पंरतू माहीती अधिकार दिन साजरा करण्याबाबत बीड जिल्ह्यातील कोणत्या शासकिय कार्यालयाने माहीती अधिकार दिन निमित आयोजित कार्यक्रमाची माहीती प्रसार माध्यमांना आणि समाजिक/राजकिय /माहीती अधिकार/ कार्यकर्त्यांना दिलेली नाही त्यामुळे माहीती अधिकार दिन कसा साजरा करायचा याबाबत अधिकारी संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. बीड जिल्ह्यातील माहीती अधिकार कार्यकर्ते माहीती अधिकार दिनानिमित आयोजित कार्यक्रमाची माहीती अधिकारात मागणार असल्याचे ही सागण्यात आले आहे. शासन निर्णयानुसार "28 सप्टेंबर " हा दिवस आंतरराष्ट्रीय "माहिती अधिकार दिवस" म्हणून राज्यभर साजरा करण्यात यावा असा निर्णय शासनाने घेतलेला आहे या दिवशी स्पर्धा, निबंध, वकृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा तसेच व्याख्यानमाला " माहितीचा अधिकार " या विषयावर उपक्रम घेऊन सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये उपक्रम आयोजित करावेत तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते व इच्छुक गटांकरिता भित्तीपत्र, निबंध स्पर्धा, व्याख्यानमाला इ. आयोजित करून माहीती अधिकार दिन साजरा करावा असे आदेश शासनाचे आहेत. परंतू प्रशासकिय कार्यालयाकडून बीड जिल्ह्यात असे कोणतेही उपक्रम राबविले जात नसल्याचे ही बोलले जात आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
আন্তঃজিলা বিদ্যালয় ছোৱালী হকী প্ৰতিযোগিতাত নাহৰকটীয়াৰ সাফল্য ।
১৭ বছৰ অনুৰ্ধ আন্তঃজিলা বিদ্যালয় হকী প্ৰতিযোগিতা ২০২২ ত ডিব্ৰুগড় জিলাৰ হৈ নাহৰকটীয়া উচ্চতৰ...
સ્પોર્ટ ડે નિમિત્તે માળીયા હાટીના ગિરનાર મીડીયમ ઈંગ્લીશ સ્કૂલ ખાતે વાર્ષિક રમત ઉત્સવ નું કરવામાં આવ્યું આયોજન
આજે સ્પોર્ટ દિવસ છે ત્યારે બાળકો સ્પોર્ટ ક્ષેત્રે આગળ વધે તેમજ તેમની શારીરિક તદુરસ્તી જળવાય રહે...
सलमान खान को धमकी देने वाला गिरफ्तार:कहा था- तुम्हें छोड़ूंगा नहीं; मुबंई पुलिस ने नोएडा से पकड़ा
मुंबई में NCP नेता बाबा सिद्दीकी की हत्या के बाद सलमान खान को धमकी देने वाले को मुंबई पुलिस ने...
कोकण रेल्वे मार्गावर जबलपूर - कोईमतूर साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस ७ पासून धावणार
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील जबलपूर - कोईमतूर साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेसला पश्चिम व...
मुलगी पळून गेल्याचा राग अनावर झाला अन...
बारामती: प्रेमविवाह करणाऱ्या तरुणीच्या आईने आणि भावाने प्रियकराच्या भावावर जीवघेणा हल्ला केला...