स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यदिनी प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवावा

 आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे जनतेला आवाहन

भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन अधिकाधिक घरी तिरंगा ध्वज फडकवला जावा यासाठी करावे प्रयत्न

गडचिरोली (महाराष्ट्र) दि ४ ऑगस्ट :-भारत स्वातंत्र्य होवून ७५ वर्ष पुर्ण होत आहेत या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने येणाऱ्या स्वातंत्र्यदिनी प्रत्येक घरावर भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकवावा असे आवाहन आमदार डॉ देवरावजी होळी यांनी जिल्ह्यातील जनतेला केले आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी भारताच्या या 75 व्या स्वातंत्र्यदिनाला आजादी का अमृत महोत्सव"असे म्हटले आहे. या अमृत महोत्सवानिमित्त मागील वर्षभरापासून मोठ्या प्रमाणावर नवनवीन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत. येत्या १५ ऑगस्टला ७५ वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त देशातील प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकविण्यात यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे .त्यांच्या या आवाहनाला देशातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून स्वातंत्र्यदिनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज तिरंगा फडकवून आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.भारतीय जनता पार्टीच्या वतीने देखील "हर घर तिरंगा" हे अभियान राबवण्यात येत असून त्या दृष्टिकोनातून भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. येत्या १३ ऑगस्ट पासून १५ ऑगस्ट पर्यंत देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा आपल्या घरावर उंच जागी फडकवण्यात यावे यासाठी देशातील विविध संघटनांनी हर घर तिरंगा हे अभियान हाती घेतलेले आहे.

भाजपाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी अधिकाधिक घरापर्यंत पोहोचावे. आपला आजादी का अमृत महोत्सव उत्तमरीत्या साजरा करावा असे आवाहन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले आहे.