परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यातील फरकंडा येथील संबधित शेतकऱ्यांनी अनेक वेळा नांदेड पाटबंधारे विभागाकडे तसेच मुख्यमंत्री कार्यालयाकडे निवेदन दिली आहेत, अद्याप पुर्णत: मोबदला मिळालेला नाही संपादित जमिनीच्या तुलनेत "तो" उर्वरित मोबदला नाही. आज ही अनेक धरणग्रस्त शेतकरी मोबदल्या पासून वंचित आहेत. फरकंडा येथील शेतकऱ्यांनी शेवटी कंटाळून पुन्हा मुख्यमंत्री कार्यालयाकडे निवेदन पाठविले आहे, आता त्यांनी तुमचे पत्र / निवेदन पुढील कार्यवाहीसाठी पाठविल्याचे उत्तरादाखल संबधित शेतकऱ्यांना कळविले आहे असेच जर वेळो-वेळी झाले तर "या" शेतकऱ्यांनी न्यायासाठी जायचे कोणाकडे हा प्रश्न उपस्थित होत आहे
नांदेड पाटबंधारे विभाग शासनाकडे मार्गदर्शनावर मार्गदर्शन मागविण्यात येत आहे शेतकऱ्यांनी पालम तालुक्यातील फरकंडा येथील शेतकऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हा प्रश्न उपस्थित केला आहे जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी वर्षानुवर्षी चाललेला लढा आता शिंदे सरकार गांभीर्याने घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळेल का आता सर्व शेतकऱ्यांचे शिंदे सरकारच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे.