औरंगाबाद : उद्धव ठाकरेंनी अडीच तासांच्या औरंगाबाद दौऱ्यात अवघी 24 मिनिटे पाहणी केली. आता महाराष्ट्रातील नुकसानीची पाहणी 24 मिनिटांमध्ये हाईल का? असा सवाल कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित केला. तसेच आदित्य ठाकरेंनी त्यांच्या वडीलांना बाण, बांध यावर विचारणा करावी? असा सल्लाही सत्तारांनी दिला.ज्यांना बांध समजत नाही ते बांधाबद्द्ल काय बोलणार? ठाकरेंना स्वत:चा बाण सांभाळता आला नाही ते बांध काय सांभाळतील असा खोचक टोला देखील अब्दुल सत्तारांनी अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरेंना लगावला. पुढे सत्तार म्हणाले, घरामध्ये बसून चॉकलेट खाणे किंवा संगणकावर बसणे वेगळे असते, तर शेताच्या बांधावर पाहणी करणे वेगळे आहे. ठाकरेंनी औरंगाबाद जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. आता आदित्य ठाकरेही, पाहणी दौरा करत शेतकऱ्यांचे म्हणणं ऐकून घेत आहेत. यावेळी त्यांनी कृषीमंत्री सत्तार यांच्यावर टीका केली. आता यावरून दोन्ही गटातील नेते आमने- सामने आल्याचे चित्र आहे.2020 च्या खरीप हंगामातील पीक विम्याची उर्वरित रक्कम 331 कोटी तसेच 2021 चे 388 कोटी विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, सप्टेंबर महिन्यातील नुकसानभरपाई अनुदान 248 कोटी व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आमदार कैलास पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले. यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या गटातील नेते आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये मोठा वाद निर्माण होताना दिसत आहे.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं