कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील निसर्ग मित्र देविदास थोरात यांनी गावातील सार्वजनिक ठिकाणी जि प प्रशाला, केंद्रीय प्राथमिक शाळा, भिकनशावली बाबा परिसर, ठिकाणी 30 कोरपडीचे वनस्पतीचे वृक्षरोपण केले आहे. गावातील कोणत्याही व्यक्तीस या वनस्पतीची गरज भासल्यास मोफत व तत्काळ उपलब्ध झाली पाहिजे या उद्देशाने निसर्ग मित्रांने स्वतःच्या शेतात रोप तयार करून एक वर्षानंतर ते रोप गावातील सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण केले आहे. अनेक वर्षापासून गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करून संगोपन करण्याचे सामाजिक पर्यावरणाचे कार्य करीत आहे. वृक्षारोपण अनेक करतात परंतु वृक्षाचे संगोपन होत नाही त्यामुळे वृक्ष जगत नाही परंतु या अवलीया निसर्ग मित्राने आजपर्यंत लावलेल्या सर्व झाडांचे संगोपन करून लहानाचे मोठे केले आहे.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं