औरंगाबाद : दिवाळीच्या मुहूर्तावर शंभर रुपयांच्या किटला मुहूर्त लागेना गरीबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी राज्य सरकार कडून शिधापत्रिका धारक कुटुंबासाठी अवघ्या शंभर रुपये रवा , चणाडाळ , साखर , पामतेल दरात किट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . रेशन दुकानात राज्य सरकारच्या वतीने ' आनंदाचा शिधा ' असे जाहिरात करणारे फलकही लावण्यात आले . मात्र , उद्या दिवाळी सुरू शंभर रुपयांची किट अद्यापही रेशन दुकानात उपलब्ध झाल्या नसल्याने दुकानदार ही संभ्रमात पडले आहे . दिवाळी सणानिमित्त लाभार्थ्यांना खुश करण्यासाठी राज्यशासनाने हा चांगला निर्णय घेतला परंतु नियोजनाअभावी रेशनदुकानात किट उपलब्ध झाली नाही . दिवाळी रेशनिंग दुकानातून शंभर रुपयाचा रवा साखर गोड तेल चणाडाळ या वस्तू आनंदाचा शिधा म्हणून देण्याची घोषणा सरकारने केली होती . या वस्तू पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे फोटो असलेल्या पिशवीतून देण्यात येणार होते . मात्र सरकारच्या घोषणेनंतरही या वस्तू दिवाळीच्या आधी ठरलेल्या वेळेत वाटप झालेल्या नाहीत दिवाळी अवघ्या चार दिवसावर असताना अद्याप रेशन दुकानावर किट उपलब्ध झाल्या नसल्याने नायब तहसीलदार दत्ता निलावाड यांनी सांगितले . यामुळे दुकानदार ही संभ्रमात पडले आहे . एकीकडे राज्य सरकारने जि . आर . काढला असून त्याप्रमाणे आडुळ परिसरात कोणत्याच दुकानावर रेशन किट उपलब्ध झालेली नाही तरी गरीबाची दिवाळी फक्त कागदावरच होते कि काय अशी चर्चा होत आहे