*गोल्डन स्टार इंग्लिश स्कुल व संदीपान विद्यालय "शेकटा"* *येथे पर्यावरण पूरक गणेशमूर्ती कार्यशाळा संपन्न* *बिडकीन -प्रतिनिधी* - दि. ३० ऑगस्ट २०२२- कोरोना महामारीच्या २ वर्षांच्या निर्बंधानंतर यावर्षी पुन्हा नव्याने, उत्साहाने गणेश उत्सव साजरा केला जात आहे या अनुषंगाने *संदीपान विद्यालयात व गोल्डन स्टार इंग्लिश स्कुल "शेकटा"* मध्ये लिपॉक सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने "इको फ्रेंडली शाडू मातीचे गणपती" मूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचा उद्देश पर्यावरणपूरक व पाण्यात विरघळणारे गणपती बनवणे हा होता. पर्यावरण संवर्धनासाठी नेहमी आग्रही असलेल्या, लिपॉक सोशल फाऊंडेशन संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या या कार्यशाळेच्या प्रमुख मार्गदर्शक *श्रीमती शारदा प्रेम शिंदे*  यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व सांगितले तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसचे बनवलेले गणपती पर्यावरणास हानिकारक आहे व ते पाण्यात विरघळत नाही त्यामुळेच विसर्जनानंतर नदीकाठी मूर्तीचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात . पीओपी जिप्सम या खनिज पदार्थापासून बनवले जाते . पाण्याच्या संपर्कात आल्यावर ते कडक होते आणि एकदा कडक झाल्यावर ते अविघटनशील बनते,त्यामुळे ते पाण्यात विरघळत नाही,पाणी दूषित होते. तसेच गणपती बनवण्यासाठी लागणारे साहित्य  हानिकारक रसायनांपासून बनवले जातात जे मूर्ती सजवण्यासाठी वापरतात ते देखील पर्यावरणास हानी पोहोचवतात. त्या तुलनेत शाडू माती विघटनशील आहे . गणेशमूर्ती अवघ्या एक ते दीड तासांत ती विरघळते . तिचे पाण्यात लगेचच वहन होते .अशा पध्दतीने जर गणपती तयार केले तर गरीब कुटुंबांनाही सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करणे परवडणारे आहे.. शारदा शिंदे  यांनी अत्यंत सोप्या आणि खेळीमेळीने सर्व विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीचा वापर करून आधी मुलांना प्रत्यक्ष मुर्ती बनवून दाखवली. इतक्या सोप्या पद्धतीने मुर्ती बनवता येते हे पाहून मुलांचा उत्साह खूपच वाढला. नंतर मुलांनी स्वतः च्या हाताने मुर्ती बनवण्यासाठी प्रयत्न केला. आपण बाप्पाची मुर्ती बनवू शकतो याचा विशेष आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होता विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात आपले *“इको फ्रेंडली गणपंती” स्वतः बनविले.* आम्ही शिकविलेल्या जर २०० विद्यार्थ्यांनी POP मूर्ती वापरल्या नाहीत तर आम्ही २०० मूर्ती पाण्यात विसर्जित करण्यापासून कमी केल्या आहेत.विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले गणपती घरी बसविल्यास सुमारे प्रत्येक कुटुंबातील ३०० ते ५००₹ रक्कम वाचणार आहे.. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी गोल्डन स्टार इंग्लिश स्कुलचे प्राचार्या स्वाती लघाने/मुळे व संदीपान विद्यालयाचे सहशिक्षक आर व्ही खरात सर,लिपॉक संस्थेचे सचिन गोरे,संघपाल इंगळे ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे  सहकार्य लाभले. रविंद्र गायकवाड, बिडकिन