नांदगाव तालुक्यातील ढेकु येथील कपिलनाथ मठाचे मठाधिपती बाल ब्रम्हाचारी रामदेव बाबा ( देवबाबा ) यांचे शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास औरंगाबाद येथील कुष्णामाई या खाजगी रुग्णालयात वयाच्या 75 व्या वर्षी देहावसान झाले . रामदेव बाबा ( देवबाबा ) यांच्या निधनाने नांदगाव , कन्नड , वैजापूर , चाळीसगाव या तालुक्यातील भक्त परिवारात मोठी शोककळा पसरली आहे . आज शुक्रवारी दोन वाजता कपिलनाथ मठात त्यांना निरोप देण्यात आले . ढेकूत झाला जन्म बालब्रह्मचारी देव बाबाचा 1 जानेवारी 1947 साली ढेकू येथील शेकु पा.सुर्यवंशी , राधाबाई सुर्यवंशी या शेतकरी दाम्पत्याच्या पोटी ढेकू येथे जन्म झाला . शेतकरी कुटुंबात जन्म झाल्याने बालपणापासून आपल्या मोठ्या भावासोबत ते गायी चारण्यासाठी ढेकू गावाजवळ असलेल्या डोंगरात जात असत . मंदिरांचा केला जिर्णोद्धार भैरवनाथाचे एक पुरातन हेमाडपंथी शिल्पकलेचा हे आविष्कार असलेले भैरवनाथाचे मंदिर हे दुर्लक्षित होते तसेच मंदिर परिसराला काटवनाने वेढले होते . त्यावेळेस रामदेव ( देवबाबा ) बाबांनी मोजक्या भक्तांना एकत्रित करून या मंदिर परिसराची साफसफाई करून भैरवनाथाच्या मंदिराचा जिर्णोद्धार केला