रत्नागिरी : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशन आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय किशोर-किशोरी खो-खो स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या १४ वर्षाखालील किशोर व किशोरी संघ जाहीर करण्यात आले.
कोरोनातील दोन वर्षानंतर प्रथमच क्रीडा स्पर्धा होत आहेत. रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर होणार्या या स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा किशोर-किशोरी संघाची निवड चाचणी १५ दिवसांपूर्वी झाली. यात जिल्ह्यातील विविध तालुक्यातून संघ सहभागी झाले होते. काही खेळाडूही निवड चाचणीसाठी उपस्थित होते.
मुलांमध्ये राहुल वालम, आर्यन बालदे, आशिष बालदे, आर्य भुवड, आयुष गराटे, आयुष इंगळे, समर्थ उपशेट्ये, प्रणय पालकर, कार्तिक सावंत, अथर्व गराटे, सिद्धेश ठुकरूळ, पार्थ बुदर, साईराज दरडे, अभिषेक बालदे, मनिष इंगळे यांची निवड झाली असून या संघाचे प्रशिक्षक म्हणून आकाश सोळंकी तर व्यवस्थापक किरण भोसले आहेत.
मुलींच्या संघामध्ये आर्या डोर्लेकर, मृण्मयी नागवेकर, स्वामिनी सावंत, श्रावणी सनगरे, तन्वी खानविलकर, अस्मि कर्लेकर, सिया चव्हाण, मृदुला मोरे, रिद्धी चव्हाण, साक्षी लिंगायत, प्रियल अहिवले, स्वरांजली कर्लेकर, रिया तांबे, आरती पाष्टे, कस्तुरी मेस्त्री यांची निवड झाली असून त्यांना प्रशिक्षक म्हणून पंकज चवंडे मार्गदर्शक आहेत.