भोगाव शिवारात गांजाच्या शेतीवर हट्टा पोलिसांची धाड; कारवाईत मोठा मुद्देमाल जप्त

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातल्या भोगाव गावाच्या कापुस शेत शिवारामध्ये आनंता गाडगे या शेतकऱ्याने गांजाची लागवड केल्याची माहिती हट्टा पोलीसांना मिळाली होती त्यावरून एक पथक तयार करून या गांजाच्या शेतीवर कारवाई केली त्यात अंदाजे 3 लाख 70 हजार रुपये किमतीची 74 गांजाचे झाडे आढळून आले आहेत हट्टा पोलिसांनी ही सर्व झाडे उपटून जप्त केले आहेत आणि आरोपी आनंता गाडगे यांच्या विरोधामध्ये हट्टा पोलिसांमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया चालु आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी वाखारे, हट्टा पोलीस स्टेशनचे सपोनी गजानन बोराडे यांच्या पथकांनी केली कामगीरी