संगमेश्वर : तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या,माखजन इंग्लिश स्कूल,ऍड पी आर नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात भारताचे थोर शास्त्रज्ञ,माजी राष्ट्रपती कै. डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.

    

१० ऑक्टोबर पासून प्रशालेत संस्थापक दिनाचे औचित्य साधून पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आले होते.हे प्रदर्शन विद्यार्थ्यांसह ,पालक व परिसरातील नागरिकांसाठी खुले करण्यात आले होते.या प्रदर्शनात विविध प्रकारच्या साहित्याची मांडणी करण्यात आली होती.या प्रदर्शनाला पुण्याचे प्राच्य विद्या अभ्यासक आशुतोष बापट यांनी देखील भेट दिली होती.भेटीदरम्यान त्यांनी प्राचीन भारताचा अभ्यास करताना लिहिलेली १२ पुस्तके देणगी स्वरूपात दिली होती.त्या पुस्तकांची मांडणी देखील या प्रदर्शनात करण्यात आली होती.

    

कै. डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर यांनी कै. ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.यावेळी पर्यवेक्षक अंबादास घाडगे,गणेश शिंदे,मानसी कोवळे,कांचन जंगम,ग्रंथपाल श्रीरंग कुंभार,महादेव परब,विद्यार्थी उपस्थित होते.पुस्तक प्रदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला.