रत्नागिरी : जिल्ह्यासह शहरामध्ये मोठ्या प्रमाणात दुधाची आवक मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु दूध तपासणी मात्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे होत नसल्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो की काय? असा प्रश्न आता जनतेला पडला आहे. अनेक जिल्ह्यामध्ये भेसळयुक्त दूध दिले जात असल्याच्या तक्रारी केल्या जातात. त्यावर अन्न औषध प्रशासन कारवाई करते. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात अन्न औषध प्रशासनाकडे असणाऱ्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे अशी कारवाई होताना दिसून येत नाही.
रत्नागिरी शहरासह जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुधाची आवक परजिल्ह्यातून केली जाते. येणारे हे दूध कोणत्या क्वॉलिटीचे आहे. तसेच ग्राहकमंचाकडून आलेल्या दुधाची जास्त दराने विक्री होते की नाही याचीही तपासणी केली जात नाही. जिल्ह्यासह शहरामध्ये मोठ्या प्रमाणात एमआरपीपेक्षा जास्त दराने ग्राहकांना दूध विकले जात असून अधिकारी करतात काय? असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे. एमआरपीपेक्षा जास्त दर घेतल्यास अशा व्यावसायिकांवर दुकानदारांवर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले असताना रत्नागिरी शहरासह जिल्ह्यात अशा प्रकारची कारवाई होताना दिसून येत नाही. त्यामुळे शहरात दिवसाला अशाप्रकारे लाखो रुपये कमावले जातात, याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.