हिंगोली जिल्ह्याभरात मागील दहा दिवसांपासून परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने ऐन सोयाबीन काढणीची वेळ अशातच दररोज सुरू असलेल्या पावसामुळे शेतात कापलेलं सोयाबीन कोंब येत असुन निसर्गाच्या लहरीपणामुळे पुन्हा शेतकरी संकटात सापडला आहे एकीकडे शेतकऱ्यांकडे पैसा नाही शेतातील पिकांचे नुकसान झाले असून खर्च सुद्धा वसुल होईना तर दुसरीकडे सरकारकडून नुकसान अनुदान वाटप केले नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात साजरी करावी लागणार आहे.