मंडणगड : तालुक्यातील घराडी व निगडी या दोन ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्यांचे सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी प्रक्रीया संपन्न झाली . निकालानंतर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सत्ताकारणात शिवसेना व राष्ट्रवादी या तालुक्यातील क्रमांक एक व दोनचे पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकांना समोरे गेलेले असतानाही घराडी व निगडी या दोन्ही ग्रामपंचायतीवर एकट्याने लढणाऱ्या आमदार योगेश कदम यांच्या शिंदे गटाचेच सरपंच निवडुन आले. निगडी ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने पुर्णपणे वर्चस्व राहीले . सरपंच व सदस्य अशा दोन्ही आघाड्यावर शिंदे गटाचा वरचष्मा राहीला तर घराडी ग्रामपंचायतीचा थेट सरपंच शिंदे गटाचा निवडून आला असला तरी ४ सदस्य आघाडीचे व ३ सदस्य शिंदे गटाचे निवडून आल्याचा दावा बाळासाहेबांची शिवसेना गटाचे तालुका प्रमुख प्रताप घोसाळकर यांनी निवडणुक निकालानंतर केला . 

     घराडी ग्रुप ग्रामपचायतींचे सुलभा प्रमोद चव्हाण , तर निगडी ग्रामपंचायतीचे सरपंचपदी सईदा मुराद कोंडेकर लोकनियुक्त थेट सरपंच म्हणून निवडून आल्या . मतमोजणी प्रक्रीया शांततेत संपन्न होण्यासाठी तहसिल कार्यालयाचे आवारात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता . निवडणूक अधिकारी म्हणून पवन गोसावी , किरण पवार यांनी काम पाहिले .

      घराडी ग्रुप ग्रामपंचायत थेट सरपंचाचे निवडीत सुलभा प्रमोद चव्हाण ५१० मते मिळवून विजयी झाल्या त्यांच्या प्रतिस्पर्धी समिक्षा सुनिल सावंत यांना ४२० मते मिळाली . प्रभाग क्रमांक एक ( घराडी ) मधून अनिषा अनिल फणसे १४८ मते , मयुरी मिलींद मोरे १५५ मते , गणेश धनराज बारस्कर १३८;मते मिळवून विजयी झाले . प्रभाग क्रमांक दोन मधुन ( नारगोली ) दशरथ मधुकर साळुंखे , दर्शना दगडू साळुंखे , सुशिल महादेव वजीरकर यांची बिनविरोध निवड झाली आहे . प्रभाग क्रमांक तीन ( घराडी ) मधून सविता संतोष बैकर २१७ मते , माधवी महादेव सुखदरे २०२ मते मिळवून विजयी झाल्या . प्रज्ञा प्रकाश जाधव यांची बिनविरोध निवड झाली . 

     निगडी ग्रुप ग्रामपंचायत थेट सरपंचाचे निवडी प्रक्रीयेत सईदा मुराद कोंडेकर ४५७ मते मिळवून विजयी झाल्या . त्याच्या प्रतिस्पर्धी महेफूजा मिनार कोंडकर यांना ३१९ मते , अनिता अनिल साखरे यांना ५ मते मिळाली . निगडी प्रभाग क्रमांक एक मधून सचिन यशवंत सावंत १२९ मते , अस्मा सुऐब चिपोलकर १४४ मते मिळवून विजयी झाले . प्रभाग क्रमांक दोन मधून अशोक अर्जुन पवार १३५ मते , गजाला नजिर कोंडकर १५२ मते , संजना संदेश साखरे १३६ मते मिळवून विजयी झाले . प्रभाग क्रमांक तीन मधून कामरुन्निसा महमुद ओंबीलकर १६६ मते , रुपेश गजानन निगुडकर १५८ मते मिळवून विजयी झाले .