डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मान्यता प्राप्त सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राकडून बँक, रेल्वे, एल.आय.सी, लिपीकवर्गीय व तत्सम पदाच्या स्पर्धा परिक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत स्पर्धा कोचिंगसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण (कोचिंगसाठी) अर्ज मागविण्यात आले होते. त्यांची चाळणी परीक्षा घेण्यात आली. त्यातील मिरीटनुसार १५० विद्यार्थ्यांची करण्यात आलेली आहे. या मोफत बॅचचा शुभारंभ बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या उपस्थितीत होणार आहे. हा कार्यक्रम बीड शहरातील सावंत प्लाझा, मित्र नगर चौकाजवळ शिवाजी नगर येथे बार्टी मार्फत सुरु असलेल्या सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र येथे मंगळवार दि. ११ रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. अशी माहिती सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे सचिव राहुल वाघमारे यांनी दिली आहे.