कर्ज बाजारीपणामुळे शेतकऱ्यांची आत्महत्या.
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
"पैठण तालुक्यातिल तुपेवाडी तांडा येथील घटना"
पाचोड(विजय चिडे) कर्ज बाजारी पणा कंटाळून पैठण तालुक्यातिल तुपेवाडी तांडा येथील एका ५२ वर्षीय व्यक्तीने शनिवारी स्वतःच्या शेतात (दि.८) रोजी दुपारी विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस घडली असून उतम छगन राठोड असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,उतम राठोड यांच्या मुलीचा चार वर्षापूर्वी विवाह झालेला असून त्यावेळी त्यांनी मुलीच्या विवाहासाठी हात पैसे उसने घेतलेले होते ते कर्ज अद्यापही फिटले नाही.यंदा शेतातून चांगले उत्पन्न होईल अशी अपेक्षा होती. मात्र अपेक्षावरही पाणी फेरले गेले आहे. सध्या राठोड हे शेती सह इतर ठिकाणी मोलमजुरी करत असल्याची चर्चा गावकऱ्यांना असुन त्यांच्यावर तीन ते चार लाखांचे कर्ज असल्याचे चर्चा असून याच कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली दुपारी चारच्या सुमारास शेतात कोणीही नसताना ते विषारी औषध पिऊन झोपले असल्याने कोणाच्याही लक्षात आले नाही. सायंकाळीच्या वेळी घरातील सदस्य शेतात गेलेवर त्यांनी सदरील प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ औरंगाबाद येथील चिकलठाणा येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करून केले. वैद्यकीय अधिकारी त्यांची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला असुन या घटनेची आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार रावसाहेब आव्हाड सह पोलिस नाईक बागवान करीत आहेत