औरंगाबाद : ईद - ए - मिलादुन्नबीनिमित्त रविवारी ( ९ ऑक्टोबर ) शहरात जुलूस काढण्यात आला तसेच . जमाअत - ए - इस्लामी हिंदच्या वतीने सहा ठिकाणी सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . इस्लाम धर्माचे शेवटचे प्रेषित हजरत मुहंमद पैगंबर ( स . ) यांचा जन्मदिवस ईद - ए - मिलादुन्नबी म्हणून साजरा केला जातो . यानिमित्त जुन्या शहरातील रस्ते , विविध चौक , मशिदींवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे . ठिकठिकाणी हिरवे झेंडे विक्रीसाठी स्टॉल्स लावले आहेत . रविवारी सकाळी ९ वाजता ईद - ए - मिलादुन्नबी इंतेजामियाँ कमिटीच्या वतीने सकाळी ९ वाजता हजरत निजामुद्दीन चौक येथून भव्य जुलूस काढण्यात येणार आहे . शहागंज , राजाबाजार , जिन्सी , कैसर कॉलनी , चंपा चौक , शहाबाजार , मंजूरपुरा , लोटाकारंजा , बुढीलेन , जुना बाजार , सिटी चौक , सराफा , गांधी पुतळा येथून हजरत निजामुद्दीन चौक येथे मिरवणूक विसर्जित होणार आहे . या वेळी ध्वजारोहण केले जाणार आहे . आझाद चौक , रोशन गेट , सिटी चौक , शहागंज आदी ठिकाणी सरबत वाटप , अन्नदान करण्यात येणार आहे