पैठण तालुक्यातील बिडकिन येथील मारवाडी गल्ली येथे दोन ठिकाणी घरफोडी...

घरफोडीत ८०,००० रुपयांचा ऐवज लंपास..

ठस्से तज्ञ पथकास पाचारण...

बिडकिन प्रतिनिधी:-

पैठण तालुक्यातील बिडकिन येथील मारवाडी गल्ली येथे काल रात्री उशिरा अंदाजे १ ते २ च्या सुमारास मारवाडी गल्ली येथील फिर्यादी संजय कृष्णराव जोशी व रत्नाकर रामभाऊ भवर दोन्ही रा.मारवाडी गल्ली, बिडकिन हे दिपावली निमित्त बाहेर गावी गेले असता दोन्ही घरांना कुलुप लावले होत्या.काल रात्री उशिरा अज्ञात चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने घराची कुलुप तोडून घरातील सोने व चांदी आणि रोख रक्कम लंपास केली आहे.दोन्ही घरातील एकुण ८०,०००/- रुपयांचा ऐवज लंपास झाल्याची घटना घडली आहे.बिडकिन पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून दोन्ही फिर्यादी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

यावेळी सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की,आपण काही कामानिमित्त बाहेर गावी जाणार असाल तर शेजारच्या लोकांना याविषयी सांगुन जावे.स्थानिक पोलिस प्रशासनाला माहिती द्यावी.

बिडकिन येथील दोन्ही घरफोड्या या पोलिस ठाण्याचे जवळच झाल्या असल्याने नागरिकांना भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे..

सदरील घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हॅड कॉन्स्टेबल सतिश बोडले हे करित आहेत

रविंद्र गायकवाड, बिडकिन