शिरुर: शिरुर-चौफुला रस्त्यावर गुरुवार (दि 6) रोजी रात्री 7:30 च्या सुमारास आंबळे गावच्या अलीकडे चासकमान कॅनॉलवर एस टी ने धडक दिल्याने महादेव ज्ञानोबा गाडेकर (वय ४०) मूळ रा. माजलगाव ता. माजलगाव जि. बीड सध्या रा. पांढरेवस्ती आंधळगाव ता. शिरूर जि. पुणे यांचा जागेवर मृत्यू झाला तर त्यांचा आठ वर्षाचा मुलगा आरोह हा जखमी झाला आहे. याबाबत सोनाली महादेव गाडेकर (वय ३०) यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महादेव ज्ञानोबा गाडेकर हे आंधळंगाव येथील पांढरेवस्ती येथे राहत होते.गुरुवार (दि 6) रोजी रात्री 7:30 च्या सुमारास आपला आठ वर्षाचा मुलगा आरोह गाडेकर याला घेऊन ते आपल्या मावशीच्या घरुन त्यांच्या होन्डा शाईन मोटार सायकलरुन आंधळगावकडे जात असताना आंबळेगावच्या अलीकडे चासकमान कॅनालवर आल्यानंतर समोरून आलेल्या एस टी क्रं एम एच 06 एम 8942 ने त्यांना जोरदार धडक दिल्याने महादेव गाडेकर यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा आठ वर्षाचा मुलगा आरोह हा जखमी झाला. याबाबत सोनाली महादेव गाडेकर यांनी शिरुर पोलिस ठाण्यात शिरुर आगाराचे एस टी चालक गोवर्धन जर्नादन तातखडे फिर्याद दाखल केली असुन शिरुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक अनिल चव्हाण हे करत आहेत.