औरंगाबाद : कोरोना काळानंतर यंदा प्रथमच फुल शेतीच्या बाजारपेठ फुलल्याने शेतकरी वर्गात समाधानी वातावरण असल्याचे चित्र आहे.वाळूज औद्योगिक नगरीतील उद्योजक दसऱ्याच्या आदल्या दिवशीच कारखान्यातील यंत्रसामुग्रीची पूजा करत असतात. त्यामुळे आज  परिसरात झेडु च्या फुलाची विक्रमी विक्री होत असते. दसरा सणाच्या निमित्ताने वाळूज औद्योगिक नगरीत  सकाळपासूनच फुलांच्या राशींनी बाजारपेठा सजल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. यंदा झेंडूच्या फुलांना 80 ते 125 रुपये किलो असा भाव मिळत आहे, यामुळे फुलशेती कसणारा शेतकरी समाधानी आहे.