रत्नागिरी : रेल्वे प्रवासादरम्यान तरुणाचा मोबाईल लांबवल्याची घटना २५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ६.३० ते ६.४५ वाजण्याच्या कालावधीत रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर घडली. याप्रकरणी अज्ञाता विरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत मंजित अजित सिंग (वय २३, रा. गुरुग्राम हरियाणा) याने तक्रार दिली आहे. २५ ऑगस्ट रोजी सिंग अमृतसर एक्स्प्रेसने गोवा ते दिल्ली असे प्रवास करीत होते. रेल्वे रत्नागिरी स्टेशनवर आली असता मंजित सिंग झोपेत असल्याची संधी साधत त्याच्या उशीखाली ठेवलेला आठ हजार रुपयांचा वन प्लस कंपनीचा मोबाईल अज्ञाताने चोरून नेला. याप्रकरणी पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.