वरणगावं येथील धनगर समाजाचे सामाजिक कार्यकर्ते तथा भटक्या विमुक्त समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते अरुण धनगर यांची जळगांव जिल्हा अध्यक्ष भटक्या विमुक्त वंचित बहुजन आघाडीच्या पदी निवड करण्यात आली आहे.

सदरचे निवड राज्य अध्यक्ष एस.एल.गायकवाड(सोलापूर),राज्य उपाध्यक्ष नारायण गायकवाड(पुणे),राज्य कार्याध्यक्ष रवींद्र गायकवाड ,भटक्या विमुक्त वंचित बहुजन आघाडी,महाराष्ट्र राज्य,छंपर बंद शाह समाजाचे लिकायात शाह,राज्य संपर्क तथा प्रसिद्धी प्रमुख, भटक्या विमुक्त वंचित बहुजन आघाडी, यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.

यानिवड्डीबद्दल महानुभाव(भोपे) समाजाचे बंडू कपाटे,भास्कर पालिंमकर,रवी पालीमकर,धनगर समाजाचे पिट्या धनगर राजू धनगर,शालीक धनगर, भोई समाजाचे जितेंद्र भोई, राजू भोई,भराडी समाजाचे नेते सदाशीव भराडी,वैदू समाजाचे राजेश गुंमळंकर,सीताराम गुंमळंकर,नितीन गुंमळंकर,वडार समाजाचे संपत पवार,सुरेश शिंदे,नथु पवार,प्रकाश जाधव,वंजारी समाजांचे भगवान वंजारी,सुनील वंजारी,सोपान वंजारी,कैकाडी समाजाचे सुनील भुसांडे,अंकुश गायकवाड, रवी गायकवाड, वाल्मिक जाधव,गोसावी समाजाचे बापू गोसावी,बैरागी समाजाचे राजू बैरागी,रफिक शेठ ,आदी भटक्या विमुक्त जाती जमाती समाजातील कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहेत. सदरची निवड रवींद्र गायकवाड राज्य कार्याध्यक्ष भटक्या विमुक्त वंचित बहुजन आघाडी,महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात माहिती दिली.