खेड : तालुक्यातील घाणेखुंट येथील एका 12 वर्षाच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर प्रसारित झाले. मात्र, प्रत्यक्षात पोलिसांकडे चौकशी केली असता घाणेखुंट येथील एका शाळकरी मुलीला तिची आई जबरदस्तीने शाळेत घेऊन जात असताना तिने आरडाओरडा करून आपल्या तोंडावर रुमाल टाकून आपल्याला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचा कांगावा केला. पोलिस तपासात शाळेत जाण्याचा कंटाळा आल्याने त्या मुलीने बनाव केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे साऱ्यांचाच जीव भांड्यात पडला.

या प्रकरणात पोलीस कामाला लागले असून कोणीही अफवा पसरवून नये असे आवाहन करण्यात येत आहे. मुलीचा आरडाओरडा ऐकून नागरिक जमा झाले. दरम्यान तिची आईही तिथे आली. आपल्या मुलीला पळवून नेण्याच्या प्रयत्न झाला हे पाहून मुलीची आई भेदरून गेली, पोलिस तपासात मुलीने मला शाळेत जायचा कंटाळा आला होता म्हणून मीच मला पळवून नेण्याचा प्रयत्न झाला, असे नाटक केल्याचे सांगितले.