औरंगाबाद : नोव्हेंबर २००१ पूर्वी मान्यताप्राप्त ७८ कॉलेजना अनुदानित करावे , अशी मागणी प्राध्यापक , कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र कृती समितीच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली . विना वेतन काम करून आम्ही थकलो . आता जगण्यात आम्हाला स्वारस्यच राहिले नाही , अशा शब्दांत त्यांनी व्यथा व्यक्त केली . तेव्हा पाटील यांनी लवकरच तोडग्याचे आश्वासन दिले . कॉमेंट शिष्टमंडळातील सदस्यांनी सांगितले की , गेल्या वर्षी ७८ कॉलेजची पुणे संचालक कार्यालयामार्फत संचालकांकडून तपासणी झाली . तरीही अनुदानाचा निर्णय झालेला नाही . अनेक जणांचे नोकरीचे सहा सहा वर्ष शिल्लक राहिले आहेत . जीवन जगावे कसे मुलाबाळांचा सांभाळ करावा कसा आई - वडिलांचा सांभाळ करावा कसा , असे अनेक गंभीर प्रश्न भेडसावत आहेत . शिष्टमंडळात कृती समिती अध्यक्ष प्राचार्य डॉ . बी . डी . मुंडे , प्रा . डॉ . एम . एस . मुरुडकर आदींचा समावेश होता .