कोचिंग क्लासेस असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन रविवार 21ऑगस्ट रोजी आर्यभट्ट हॉल, एमजीएम विद्यापीठ, सेव्हन व्हील औरंगाबाद येथे आयोजित केले होते. राज्यस्तरीय अधिवेशनात वाशिम जिल्ह्यातील चाणक्य कोचिंग क्लासेस संचालक प्रा. विशाल घुगे यांना कोचिंग क्षेत्रातील प्रत्येक घटकासाठी केलेल्या त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कामगिरीबद्दल व मिळालेल्या सन्मानचिन्ह बद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. कोरोना काळात कोचिंग क्लासेसचे संचालक व शिक्षकाचे देखील अतोनात नुकसान झाले. संपूर्ण दोन वर्ष कोरोनादरम्यान कोचिंग क्लासेस पूर्णपणे बंद होते. कोचिंग क्लासेस चालवणारा वर्ग सर्वात जास्त सुशिक्षित मी स्वतःच्या बळावर स्वतःचे साम्राज्य उभा करणारा वर्ग आहे. कित्येक वर्ष झाले कोचिंग क्लासेसचे संचालक व शिक्षक स्वतःसाठी व इतरांसाठी स्वबळावर स्वयंम रोजगार निर्माण करून समाजाला जीव ओतून सुशिक्षित करण्याचे काम करत आहे. सरकारची नेहमीच या समूहाकडे दुर्लक्ष राहिले आहे. पूर्ण काळात आलेल्या अनेक अडचणी सरकारकडून वारंवार कोचिंग क्लासेस बंदचे आदेश आदेश याला कंटाळून कोचिंग क्लासेस संचालकांनी एकत्र येऊन सर्व अन्यायपूर्ण परिस्थिती लढा देण्याचे ठरवले. महाराष्ट्रात जवळपास एक लाख संचालकाचे असोसिएशन तयार झाले. कोचिंग क्लासेस वर येणाऱ्या कुठल्याही अन्यायाला लढा देण्यासाठी हे असोशियन भक्कमपणे एकमेकांसोबत उभे राहून कोचिंग क्लासेस संचालक व शिक्षक यांना सन्मान व न्याय मिळवून देण्यात मदत करणार आहे. ही कोचिंग क्लासेस बळकट करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील कोचिंग क्लासेस संचालक किंवा शिक्षकांचा फार मोलाचा वाटा आहे. यात कोचिंग क्लासेस असोसिएशनचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशनात वाशिम जिल्ह्यातील सुप्रसिद्ध चाणक्य कोचिंग क्लासेसचे संचालक विशाल घुगे सरांना कोचिंग क्लासेस क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अनाथ मुलांना व सैन्यामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या मुलांना ते मोफत पणे शिक्षण देत आहेत . कोरोना काळात बऱ्याच साऱ्या रक्तदान शिबिराचे त्यांनी आयोजन केले होते या सर्व कामगिरीची राज्याच्या कार्यकारणी दखल घेतली.सदर राज्यस्तरीय अधिवेशनासाठी वाशीम येथील प्रा. पंकज कुमार बांडे, राज्यउपाध्यक्ष महाराष्ट्र , प्रा.गोपाल वांडे, पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष प्रा.अतुल कुमार वाळले ,वाशिम जिल्हा अध्यक्ष प्रा.कल्पेश राऊत ,वाशिम जिल्हा सचिव प्रा.दिलीप महले ,वाशिम तालुका अध्यक्ष प्रा.प्रवीण गोटे ,कार्याध्यक्ष वाशिम जिल्हा प्रा.भागवत सावके ,वाशिम जिल्हा प्रवक्ता प्रा.स्वप्निल बकाल ,कारंजा तालुका अध्यक्ष ,प्रा.रवी इंगोले श्याम सावंत ,सचिन शिंदे अशी वाशिम कोचिंग ची मुख्य टीम औरंगाबाद येथे राज्यस्तरीय अधिवेशनात उपस्थित होती.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
মাজুলীৰ চামগুৰি সত্ৰৰ "মুখা শিল্প"....
মাজুলীৰ চামগুৰি সত্ৰৰ "মুখা শিল্প"....
Breaking News: Operation Ajay पर भारतीय विदेश मंत्रालय का बयान | Hamas Attacks | Operation Ajay
Breaking News: Operation Ajay पर भारतीय विदेश मंत्रालय का बयान | Hamas Attacks | Operation Ajay
31 दिसंबर के बाद नहीं कर पाएंगे UPI Payment, करवा ले ये काम वरना ट्रांजेक्शन सर्विस हो जाएगी बंद!
आज कल सभी उम्र के लोग और खासकर युवा कैश रखना बंद कर डिजिटल पेमेंट पर आश्रित हो चुके हैं। ज्यादातर...
সোণাৰিৰ টিয়ক চাহ বাগিচাত কৰম সন্মিলন অনুষ্ঠিত
সোণাৰিৰ টিয়ক চাহ বাগিচাৰ যুৱ সমাজৰ উদ্যোগত আজি দিনজোৰা কাৰ্যসূচীৰে টিয়ক পূজা ফিল্ডত কৰম সন্মিলন...
Independence Day celebrated in Narmada in presence of Minister of State Kunvarjibhai Halpati
Independence Day celebrated in Narmada in presence of Minister of State Kunvarjibhai Halpati