खेड : तालुक्यातील बोरज येथे कंपनीतील एका कामगाराने ३५ लीटर डिझेल परस्पर विकल्याचा प्रकार समोर आला आहे . याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अर्जुन लखनसिंग पाटीदार , संदीप कृष्णा घाटगे ( ४०. भरणेनाका , खेड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , अर्जुन लखनसिंग पाटीदार हा छाबड़ा मरीन या कंपनीत जनरेटरच्या देखरेखीसाठी कामाला होता . कंपनीने जनरेटरसाठी आणलेले ३५ लीटर डिझेल पाटीदार याने कॅन भरुन टेम्पो ट्रॅव्हल्स चालक संदीप घाटगे याला दिले . या डिझेलची किंमत ३३ ९ ५ रुपये आहे . ही घटना २६ नोव्हेंबर रोजी घडली . याप्रकरणी कंपनीचे रोनित अनिल ईनरकर ( २ ९ . खेड ) माने खेड पोलीस स्थानकात दिली . त्यानुसार पोलिसांनी अर्जुन आणि संदीप पांच्यावर भादविकलम ३७ ९ , ४११ , ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे . याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत .