आष्टी प्रतिनिधी : तालुक्यातील कडा येथील बौध्द विहारात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने बुधवार दि.२८ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये सामाजिक कार्यकर्ते दिपक सदाशिव गायकवाड़ यांची स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश भाऊ साळवे यांच्या आदेशाने तसेच स्वाभीमानी रिपब्लीकन पक्षाचे नगर बीड प्रभारी, नाथा भाऊ आल्हाट यांच्या मार्गदर्शनाने , स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे आष्टी तालुका अध्यक्ष दिपक भैया गरुड यांच्या हस्ते गहुखेल म्हसोबाची वाडी येथील दिपक सदाशिव गायकवाड़ यांची तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे कार्यध्यक्ष आशोक भाऊ जाधव,स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे मार्गदर्शक नितीन भाऊ कांबळे,सागर घोडके,बाळा राजगुरु,आविनाश घोडके, आदी उपस्थित होते.