दिपावली सण : तात्पुरता फटाका विक्री परवान्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

         जालना ऑक्टोबर 2022 पासून दिपावली सण सुरु होत असून या सणानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी फटाका विक्री होत असते. विस्फोटक नियम 2008 मधील कलम 84 अन्वये तात्पुरत्या फटाका विक्री करण्याचे परवाने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निर्गमित होतात. सदरील तात्पुरते परवाने विहीत मुदतीत देणे सुलभ व्हावे यासाठी यावर्षी फटाका परवाना देतांना खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे. तात्पुरता फटाका विक्री नुतनीकरण व नवीन तात्पुरता फटाका परवाने अर्ज दि. 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत सदर कार्यालयास सादर करावेत. सर्व तात्पुरता फटाका विक्री परवाने वेळेत देण्यात येतील. फटाका विक्री परवान्यासाठी लागणारी कागदपत्रे - विहित नमुन्यातील अर्ज, परवाना धारकाचा फोटो, पॅन कार्ड (अनिवार्य), मतदान ओळखपत्र/ फोटो असलेला कुठलाही पुरावा, महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, अजिविका व नोकऱ्या यावरील कर अधिनियम 1975 नुसार व्यवसाय कर अधिकारी यांचेकडील नादेय प्रमाणपत्र, मुख्याधिकारी नगर परिषद, नगरपंचायत, ग्रामसेवक, ग्रामपंचायत यांच्याकडील स्थळ दर्शक नकाशासह नाहरकत प्रमाणपत्र, नवीन परवाना धारकांसाठी संबंधित पोलीस स्टेशनचे चारित्र्य प्रमाणपत्रासह नाहरकत (वरील कागदपत्रे सादर केल्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनला या कार्यालयामार्फत पत्र देण्यात येईल), वरील सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर नियमाप्रमाणे परवाना शुल्क, नुतनीकरण शुल्क शासन जमा करण्यासाठी शासकीय चलन देण्यात येइल, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

-*-*-*-*-*-