सोलापूर- सेवा पंधरवड्यानिमित्त समाज कल्याण विभाग, निरामय आरोग्यधाम आणि क्रांती महिला संघ यांच्या वतीने तृतीयपंथीयांना ओळखपत्र मिळण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात येत आहे. एकदिवसीय शिबिरामध्ये 15 तृतीयपंथीय व्यक्तीचे ऑनलाईन नोंदणी करण्यात आली असून 30 जणांचे आवश्यक कागदपत्रे प्राप्त करून घेवून ऑनलाईन नोंदणी करण्याची कार्यवाही सुरु आहे. 

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींना ओळखपत्र व प्रमाणपत्र मिळणेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, सात रस्ता, सोलापूर व अधिनस्त असलेल्या तालुका स्तरावरील सर्व शासकीय वसतीगृहामध्ये शुक्रवारी एकदिवसीय शिबीर घेण्यात आले.

तृतीयपंथीयांना शासकीय लाभ घेण्यासाठी कोणतेही प्रमाणपत्र नव्हते. शिबिराद्वारे समाज कल्याण विभागाच्या सहयोगाने त्यांना केंद्र सरकारच्या https:transgender.dosje.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर माहिती भरण्यास मदत करण्यात येत आहे. समाज कल्याण विभाग व निरामय आरोग्य धाम आणि क्रांती महिला संघ यांच्या मदतीने ओळखपत्रासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात येत आहे. आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड, फोटो, नोटरी केलेला स्टॅम्प पेपर हे वेबपोर्टलवर ऑनलाईन भरून प्रिंट काढली जात आहे. प्रिंट काढून जिल्हाधिकारी यांची स्वाक्षरी घेऊन पुन्हा अपलोड करून प्रमाणपत्र मिळणार आहे.

शिबिरास समाज कल्याण अधिकारी राजेंद्र बुजाडे, निरामय संस्थेचे कार्यक्रम अधिकारी शिवाजी शिंदे, क्रांती महिला संघाच्या रेणुका जाधव, राहुल काटकर समाज कल्याण निरीक्षक विकास राठोड कनिष्ठ लिपिक, प्रकल्प अधिकारी बार्टी, सोलापूर, तालुका समन्वयक व समतादूत यांनी ऑनलाईन नोंदणीबाबत विशेष कामकाज केले.