वडवणी (प्रतिनिधी) - तालुक्यात एआयएमआयएम पक्षाच्या वडवणी तालुकाध्यक्षपदी अकबर पठाण तर वडवणी शहराध्यक्षपदी अमीर भाई यांची असंख्य कार्यकर्ते व शेकडोंच्या जनसंख्येसमोर जिल्हाध्यक्ष अॅड. शेख शफिक भाऊ यांच्या हस्ते निवड करण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या सभेत शफिक भाऊंनी म्हटले की, स्वतःला सेक्युलर म्हणून घेणाऱ्या पक्षांना मुस्लिम नेता नाही तर फक्त कार्यकर्ते पाहिजेत. याकडे मुस्लिम समाजाने जागरूकतेने लक्ष देणे गरजेचे आहे. स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणून घेणाऱ्यांचा गनिमी कावा ओळखा, सावध व्हा. एआयएमआयएम पक्षात या. एक दिलाने काम करा. नाहीतर तुम्हाला इतर पक्ष फक्त कार्यकर्ते म्हणून वापरतील कामे झाल्यावर फेकून देतील. वेळीच सावध व्हा अन्यथा "तुम्हारी दास्ताँ भी ना होगी दास्तानों मे" असे म्हटले. 

वडवणी येथे एआयएमआयएम पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊ यांच्या नेतृत्वाखाली व प्रमुख उपस्थितीमध्ये वडवणी चे युवा नेते अकबर पठाण यांनी एआयएमआयएम पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांची वडवणी तालुकाध्यक्ष पदी व वडवणी शहराध्यक्ष पदी अमीर भाई यांची नियुक्ती करण्यात आली.

अकबर पठाण यांच्या सोबत नाजीम पठान, सोहेल शेख, राजु शेख, वाजिब कुरैशी, महेमुद शेख, अफजल शेख, खमर शेख, फरहान कुरैशी, कलाम सय्यद, मुजाहीद शेख, आमेर शेख, आबेद शेख, अफजल कुरैशी, अस्लम शेख, आयान पठान, अशफाक कुरैशी, सुमेर पठान, फरहान कुरैशी, अबरार कुरैशी, मुखीद पठान यांच्यासह अनेक युवकांनी एआयएमआयएम पक्षात प्रवेश केला.

यावेळी एआयएमआयएम पक्षाचे परळी तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक शेख शरीफ भाई, जिल्हा उपाध्यक्ष तथा बीड तालुकाध्यक्ष शेख एजाज़ खन्ना भैय्या, जिल्हा उपाध्यक्ष तथा उपसरपंच शेख युसुफ भाई, माजलगाव मतदार संघ प्रभारी सिद्दीक भैय्या, परळी कार्याध्यक्ष फेरोज खान, जिल्हा सह सचिव अन्वर पाशा, खादर कुरेशी, मोहसीन शेख, तोफिक भाई, नजीर भाई, वाजिब भाई, एजाज भाई उपली, एजाज भाई कवडगाव, युवा नेते सय्यद सैफ अली लालू भैय्या, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सोहेल शिकलगार, असीम जरगर, मुजाहेद भाई व परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.

या सभेत जिल्हा उपाध्यक्ष शेख युसूफ, जिल्हा सहसचिव अन्वर पाशा, परळीचे युवानेते कादर कुरैशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सभेचे सूत्रसंचालन अदनान खान यांनी केले.

स्थानिक आमदार निष्कामी नेतृत्व व अभद्र युतीचे जनक!

येथील विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके हे मराठा असो की मुस्लिम सर्वांसाठी निष्कामी नेतृत्व ठरले आहे. हे उच्चभ्रू मराठा नेते तळागाळातील मराठ्यांकडे ढुंकूनही पाहत नाही. मराठ्यांच्या प्रश्नात यांना जराही स्वारस्य नाही. मुस्लिम समाजाबद्दलही त्यांची हीच गत आहे. सुर्डी येथे मुस्लिम तरुणीवर झालेल्या अत्याचारा बाबत या आमदारांनी पुढे येऊन कोणतेही कार्य करणे तर दूरच याविषयी आपल्या तोंडातून ब्र ही काढला नाही. एवढेच नव्हे तर भाजपचे माजी आमदार केशव आंधळे यांच्याशी हात मिळवणी करून गेल्या नगरपंचायत निवडणूकीत अभद्र युती केली. यावरून प्रकाश सोळंके हे डुप्लिकेट सेक्युलर असल्याचे स्पष्ट दिसून आले असेही शफीक भाऊंनी म्हटले.