मुंबई

लवकरच लहुजी शक्ती सेना आयोजित मातंग समाजाचे राज्यस्तरीय पहिले अधिवेशन.

लहुजी शक्ती सेनेचे राज्य शिष्टमंडळाने आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची मुंबई येथील सागर निवासस्थानी जाऊन भेट घेतली. व राज्यभर मातंग समाजावर होत असलेल्या अन्याय, अत्याचाराची तसेच प्रलंबित असलेल्या मागण्याची महत्वपूर्ण विषयांवर  चर्चा करण्यात आली. तसेच निवेदनही सादर करण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी अन्याय अत्याचाराच्या बाबतीत कठोर पावले उचलून समाजाला न्याय देण्याचे व समाजाचे प्रश्न मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन शिष्टमंडळास देण्यात आले. यावेळी मास्को येथे रशिया विश्वरत्न साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याबद्दल आनंद व्यक्त करून शिष्टमंडळाच्या वतीने त्यांचा संघटनेचे स्कार्फ व टोपी घालून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

सदर शिष्टमंडळामध्ये लहुजी  शक्ती सेनेचे युवक प्रदेशाध्यक्ष सचिन भाऊ क्षीरसागर ,प्रदेश कार्यकारणी सदस्य बालाजी भाऊ गायकवाड ,मुंबई प्रदेश सचिव बाळू भाऊ जाधव ,तसेच मुंबई संपर्कप्रमुख महादेव लिंगायत, मुंबई युवक जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ कसबे, विश्वनाथ लिंगायत ,गणेश चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.