मुंबई: (दीपक परेराव)महाराष्ट्राने एका वर्षात ७५ हजार युवकांना रोजगार देण्याचा 'महासंकल्प' केला आहे. पहिल्या टप्प्यातील नियुक्तीपत्रे देण्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ३ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होईल.
या राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याचे थेट प्रसारण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ट्विटर, फेसबुक आणि युट्यूब या समाजमाध्यमांवरुन करण्यात येणार आहे.
यू ट्यूब- https://www.youtube.com/watch?v=RsEbGrNr4zk
ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR