परभणी,दि.17: मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रशासकीय इमारतीत आयोजित ध्वजारोहण समारंभात निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. 

यावेळी जिल्हाधीक्षक भूमी अभिलेख वसंत निकम, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आश्विनी स्वामी, उप अधीक्षक भूमि अभिलेख दत्तु सोनवणे, भूजल सर्वेक्षण अधिकारी प्रशांत पौळ, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त प्रल्हाद नेमाडे तसेच प्रशासकीय इमारत परिसरातील सर्व कार्यालय प्रमुख, अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.