वसमत : येथील पंचायत समिती कार्यालय येथे पंचायत समिती वसमत मार्फत ग्रामपंचायत मधील सरपंच व केंद्र चालक यांचे एक दिवसीय प्रशिक्षण मोठ्या उत्साहात संपन्न

पंचायत समिती वसमत येथे आपले सरकार सेवा प्रकल्प अंतर्गत आज प्रात्यक्षिक ट्रेनिंग मध्ये पुढे दिलेल्या ईं - ग्रामस्वराज्य महावनगव नमुना १ ते ३३ सर्व डाटा यांची इंट्री करणे ग्रामपंचायत जी . एम . पोस्टल वर प्रशिक्षण देण्यात आले त्यावेळी मास्टर ट्रेनर अविनाश पाटील सर, बसवंते सर , जिल्हा व्यवस्थापक प्रसाद लालपोतू सर , हार्डवेअर इंजिनियर केदार चोपडे सर यांनी मार्गदर्शन देऊन प्रशिक्षण दिले सदरील ट्रेनिंग चे आयोजन मा . गटविकास अधिकारी यु .डी .तोटावार साहेब यांच्या सूचनेनुसार आपले सरकार ता .मॅनेजर पठाण उमरान यांनी आयोजन केले या ट्रेनिंग साठी सहाय्यक बि.डि.ओ . शिंदे साहेब, विस्तार अधिकारी गोरे साहेब , कोकरे साहेब, जिल्ह्यातील तालुक्याचे सर्व तालुका व्यवस्थापक सुभाष शिंदे, गजानन हरण, विनोद बनसोडे, गंगाधर लोंढे , प . स . अधिकारी सुजित मोरे साहेब सर्व ग्रामपंचायतीतील सरपंच व केंद्र चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते