भाजपा कार्यकर्ते तथा उपसरपंच चंद्रकांत हुड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.....
निराधार महिलांना किराणा किट वाटप.....
बिडकिन (प्रतिनिधी):-
पैठण तालुक्यातील पाडळी येथील भाजपा कार्यकर्ते तथा उपसरपंच चंद्रकांत हुड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यात निराधार महिलांना किराणा किट वाटप, जिल्हापरिषद शाळा विद्यार्थ्यांना बिस्किटे वाटप,तांडा नं.01 मधील सर्व खेळाडूंना कबड्डी किट वाटप,बिडकिन ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप,भद्रा मारुती मंदिर खुलताबाद येथे महाप्रसादाचे आयोजन याप्रकारे अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आले होते.चंद्रकांत हुड यांना वाढदिवसानिमित्त केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड,भाजपा जिल्हाध्यक्ष विलास औताडे, तालुकाध्यक्ष डॉ.सुनिल शिंदे यांच्या वतीने भ्रमणध्वनीवर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असताना कार्यक्रम ठिकाणी यावेळी ग्रामविकास अधिकारी देहाडराय, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय बांडे, पोलिस पाटील कृष्णा दिसागज, तंटामुक्ती अध्यक्ष अशोकराव बांडे,भाजपा ज्येष्ठ नेते सुभाषराव बांडे, संपत महाराज हूड, भगवानराव हुड, मदनराव हुड, भगवान दादा,सुनिल शिंदे, संदिप गायकवाड,आदींसह पाडळी व परिसरातील नागरिकांची व कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.पैठण तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने हि वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला असुन त्यांना दिर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना हि करण्यात आली...
यावेळी आपण हि वाढदिवसाच्या औचित्य साधून निर्वाह खर्च न करता यांसारख्या सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन हि यावेळी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय बांडे यांनी जनसमुदायांना केले....
रविंद्र गायकवाड, बिडकिन